सकाळ हे जे काही दैनिक मनोरंजन आहे त्याला वृत्तपत्र म्हणायला जीभ अलिकडे धजावत नाही. सकाळमधल्या फोटोखालील ओळी म्हणजे तर बौद्धिक दिवाळखोरीचे नवनवे उन्मेष! सर्व व्यावसायिक मर्यादा मान्य करुनही असं वाटतं की दर्जा इतका खालावू देऊ नये.

गेली दहा वर्षे घरी येणारा सकाळ मी नुकताच बंद केला आहे. लोकसत्ता घेतो आता. एका चिंटू करता काय काय म्हणून सहन करायचं?

(सकाळकडे सर्वांच्या सहीने एखादे पत्र पाठवावे का? मंडळींचे काय मत आहे? आपले म्हणणे विस्तृतपणे मांडता येईल. काही परिणाम झाला तर बरंच म्हणायचं.....)