मांडीवरी सवत असते ह्यांच्या रात्रंदिनी
बायको लग्नाची मी जरी लावण्याची खनी
लक्ष नाही ह्यांचे जरी नटले-सजले
ल्याले पैठणी मी अथवा आखुडशी मिनी...
मारत नाहीत, झोडत नाहीत, पुरवतात हौस
लॅपटॉप ***रावांचा हा एकच आहे ग्राऊस
जळ्ळा मेला कीबोर्ड आणि जळ्ळा मेला माऊस...


दूर देशी केली बाई अहोंची साठी, भेट दिली आहे त्यांना चालण्याची काठी
***राव म्हणतात या वयात घाल टँकटॉप, स्फॅगेटी, सोडून दे ग लुगडे आता टोप-पदर-काठी

लग्नानंतर सुखाचा संसार झाला, दोनाचे चार झालो. आशीर्वाद आहे देवाचा.
देवा गेला परदेशी, ***रावांचे नाव लावून आशीर्वाद मागते तुम्हा सर्वांचा