टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी ६:४५ चा गजर लावलेला असतो पण जाग तशी त्याच्या आधीच आलेली असते. गजर झाल्यावरच उठायचे असा उसूल असल्याने करवटे बदलत गजराची वाट बघणे चालु असते. “तुझा विसर न व्हावा” चा एकदा ’गजर’ झाला की दिवस कसा मस्त जातो ! अचानक हिचा मंजुळ आवाज ऐकू येतो “लोळणे पुरे, कामावर जायचे आहे ना आज ?”. मी कुस बदलुन अजुन गजर कोठे झाला आहे असे विचारतो तेव्हा आतुन सात वाजले आहेत असे उत्तर येते. मी खडबडून उठतो, मोबाइल कडे झेप घेतो. त्याने केव्हाच मान टाकलेली असते. रात्रभर चार्जिंगलाच तर लावुन ठेवला होता, बिघडला बहुतेक ! मग समजते की कोणीतरी(?) स्वीचच ऑफ़ केलेला आहे, मग ...