माझ्या एकूण कुटुंबात फक्त माझाच मुलगा मला एकेरी नावाने संबोधतो. ते मला किंवा इतरांना आता अजिबात खटकत नाही. आईला एकेरी नावाने बोलावणे आणि वडिलांचा 'अहो बाबा' असा उल्लेख करणे याने वर्षानुवर्षे चुकीचा संदेश जात आलेला आहे, असो.
लेख छान आहे. मुलाच्या शाळेत भाषण करण्याची संधी मिळणे आणि त्यातून मुलाच्या नजरेत बाबाबद्दलचा अभिमान वाढत जाताना दिसणे हे माझ्या बाबतीतही अगदी अलीकडेच झाले आहे. म्हणून असेल कदाचित, पण लेख फार आवडला.
जाताजाताः नुकतीच बारावी झालेल्या काही मुलांना शिकवण्याची संधी अलीकडेच मिळाली. यातली काही मुले व्रात्य असतात, प्रसंगी अगदी कानफटीत वाजवावी असे वाटावे इतकी बेताल असतात. काही मुलांमध्ये तर एक जबरदस्त 'ऍटिट्यूड' असतो. पण चुचकारुन, जरा त्यांच्या पातळीवर जाऊन ( 'प्यासा' मधले उदाहरण न देता 'जाने तू या जाने ना' मधले उदाहरण देणे वगैरे) त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांना शिकवायला काही वेळा जाम मजा येते. मग त्यांना भरायला दिलेल्या 'फीडबॅक फॉर्म' मध्ये ही मुले अगदी हळवी होऊन, भारावून काहीकाही लिहितात. 'दी फ्यूचर ऑफ धिस कंट्री कॅनॉट बी सो ब्लीक, ऍज दी पेसिमिस्टस वुड हॅव अस बिलीव्ह, इफ हर यंगर जनरेशन इज कांपोज्ड ऑफ स्टफ लाईक धिस' हे वुडहाऊसचे वाक्य आठवते. पण हेही अपवादानेच.)