लेख चांगला आहे. लेखातील बऱ्याच गोष्टी आधी माहीत असल्या तरी योग्य मांडणीमुळे लेख कंटाळवाणा होत नाही.

आहारात मुख्य घटक कर्बोदकेच असली पाहिजेत.

या बाबतीत पचायला सोपी आणि ताबडतोब शर्करेत रुपांतर होऊन उर्जा देणारी  व पचायला वेळ लागणारी व त्यामुळे हळूहळू शर्करेत रुपांतर होणारी कर्बोदके असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे, असे वाटते. पहिल्या वर्गातील कर्बोदके ही सामान्यांना - विशेषतः चाळीशीतल्या आतल्या लोकांना उपयुक्त ठरावीत. दुसऱ्या वर्गातील कर्बोदके -ज्यात बहुदा चघळचोथा - 'फायबर्स' ही अधिक असतात- ही चाळीशीनंतर आणि विशेषतः मधुमेही लोकांना अधिक उपयुक्त ठरतात.