चांगल्यापैकी शिक्षण एवढ्यासाठी की हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना शिक्षण, वाचन, लेखन याचे बऱ्यापैकी वावडे आहे. संस्कारांचे तर आहेच आहे. (चिरंजीव सलमान खान, सन्माननीय संजय दत्त, आदरणीय फरदीन खान वगैरे. कपूर खानदानातला पहिला पदवीधर कोण? रणवीर कपूर? चिकित्सकांनी अधिक शोध घ्यावा) अमिताभ बच्चन, बलराज सहानी, नसिरुद्दिन शाह वगैरे अपवादच. अन्यथा गेल्या जमान्यातली एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते तसे. 'पुस्तक? मी तर आयुष्यात एकही पुस्तक वाचेलेले नाही! ' आणि ही अगदी यशाच्या शिखरावर वगैरे पोचलेली अभिनेत्री. तर ते असो.
हिंदी (किंबहुना कुठल्याही) चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना (आणि तसेच अन्य कलाकार, तंत्रज्ञ ह्यांना) फॉर्मल (मराठी प्रतिशब्द? ) शिक्षण असावे, हा आग्रह अजिबात समजला नाही. तसे शिक्षण नसतांनाही त्या अनेकांनी त्यांच्या सुंदर रचनांनी आम्हाला उपकृत केले आहेच की. जीवनाच्या धबडग्यात वाहत असतांना ह्या माणसांनी समजूतदार, संवेदनाशील नजरेने आजूबाजूस पाहून त्यांची कामे केली ती आपल्यासमोर आहेत.
दुसरे असे की रोजज्या जीवनसंग्रामापुढे ह्यातील बहुसंख्य व्यक्तिंना वाचन, लिखाण करता आले नाही, ह्यामुळे त्यांच्याबद्ददल सहानुभुती बाळगावयाची की त्यांची निर्भत्सना करायची?
आणि त्यातून जर त्या 'खालच्या पायरीवरील फिल्लमवाल्यां'पैकी (Those lowly film wallahs) एखाद्या कुण्या बिचाऱ्याने संगीत, गद्य, पद्य, मराठी वृत्ते व त्यांचे उगम, पर्शियन काव्ये, गालिब इ. वर टिपण्णी केलीच तर उच्चशिक्षणविभूषितांना त्यांच्या राखीव कुरणांवर जणू आक्रमण झाल्यासारखे वाटते. मग ते त्या व्यक्तिची कुचेष्टा करतात!! जसे इथे झाले आहे
http://mr.upakram.org/node/1820#comment-29899