न्हावी स्वतःची हजामत कुणाकडून करून घेत असावा? - हा प्रश्न मलाही पडतो. कालही पडला :-))

मान मोडणे - हा माझ्यामते भयंकर प्रकार आहे कारण मला थोडासा स्पाँडिलायटिस आहे असे आमच्या भागातल्या एका डॉक्टरांचे म्हणणे आहे. माझ्यामते मला तो रोग नसला तरीही काहीतरी नक्कीच आहे.

शेर - मी एकदा सलूनला गेलेलो असताना शेजारी एका लहान बालकाची कटिंग चाललेली होती. ते बालक बिचारे घाबरून रडत होते. न्हावी 'रडणे' मनावर न घेता "चला, चला" म्हणत कार्यरत होता. बालकाची आई त्याला 'झाली, झाली' असे म्हणून 'धीर' वगैरे देत होती.

त्यावरून मला एक शेर सुचला होता. ( कवित्व दाखवण्याची संधी का सोडू? )

रडावे बालकाने, केस कापावे हजामाने
तशी ही जिंदगी म्हणते, "चला झाली, चला झाली"

आपला लेख वाचून फार आनंद वाटला. अतिशय सुंदर लेख आहे.

गिरणी या व्यवसायावर काही लिहावेत अशी विनंती!