हिंदी (किंबहुना कुठल्याही) चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना (आणि तसेच अन्य कलाकार, तंत्रज्ञ ह्यांना) फॉर्मल (मराठी प्रतिशब्द? ) शिक्षण असावे, हा आग्रह अजिबात समजला नाही.
हा आग्रह समजणे अपेक्षितही नाही, कारण तो तसा केलेलाच नाही. हे एक साधे, सोपे निरीक्षण आहे. सिनेमासृष्टीत, विशेषतः हिंदी सिनेमासृष्टीत उच्चशिक्षित नट नट्या फारशा आढळत नाहीत हे एक तटस्थ निरीक्षण. ते मान्य असेल तर मान्य आहे म्हणा, नसेल तर नाही म्हणा. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्यांनी एरवीही औपचारिक शिक्षण पूर्ण करावेच असा लेखकाचा आग्रह आहे, असे म्हणणे म्हणजे कल्पनाशक्तीला फार म्हणजे फारच ताणण्यासारखे आहे.
दुसरे असे की रोजज्या जीवनसंग्रामापुढे ह्यातील बहुसंख्य व्यक्तिंना वाचन, लिखाण करता आले नाही, ह्यामुळे त्यांच्याबद्ददल सहानुभुती बाळगावयाची की त्यांची निर्भत्सना करायची?
माझ्या मते दोन्ही करू नये. माडगूळकरांचे (दोन्ही) शिक्षण म्हणाल तर जेमतेमच. पण गदिमा अगदी समजा एमे मराठी असते तर त्यांची प्रतिभा काय अधिक तेजोमय झाली असती काय? बहिणाबाई अगदी 'प्राध्यापक डॉक्टर बहिणाबाई चौधरी' असत्या तर त्यांचे काव्य अधिक सरस झाले असते काय? निळू फुल्यांनी तत्त्वज्ञानात डॉक्टरेट केली असती तर त्यांचा हिंदूराव धोंडे पाटील अधिक अस्सल वठला असता काय? यावर गुळमुळीतपणे 'आता हे सांगणे कठीण आहे' असे म्हणू नका. हे असले काहीही झाले नसते. त्यामुळे कलाकाराने उच्चशिक्षित वगैरे असले पाहिजे असे प्रस्तुत लेखकाचे मुळीच म्हणणे नाही. लौकिकार्थाने काहीही शिक्षण न घेता आयुष्याला सर्वार्थाने भिडलेल्या कलाकारांनी आभाळाएवढे 'परफॉर्र्मन्सेस' दिले आहेत.
पण याचबरोबर सहानुभूतीचा मुद्दा समजण्यापलीकडचा आहे. सहानुभूती कशासाठी?
बाकी प्रतिसादात दिलेला दुवा हा 'काही जुने हिशेब चुकते करण्याचा ' (सेटलिंग दी स्कोअर') भाग वाटतो, त्यामुळे त्यावर मौनच पाळणे योग्य. ते 'केसाळ, चिखलाने लिडबिडलेले कुत्रे' किमान येथे तरी येऊ नये.