RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:

नुकताच गावाला गोकुळअष्टमीला गेलो होतो, तिथली अष्टमी अगदी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते हे मला माहीत होतं, पण कधी प्रत्यक्ष अनुभव घेतला नव्हता. यंदा हा योग जुळुन आला आणि गोकुळअष्टमीचा अगदी रांगडा पण अगदी छान प्रकार बघायला मिळाला. ह्यात वेगळी गोष्ट म्हणजे अष्टमी तीन दिवस साजरी केली जाते. कृष्णजन्माच्या आधी एक दिवस हा उत्सव सुरु होतो आणि जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी म्हणजेच दहीकाल्याच्या दिवशी संपतो. त्यात अनेक खेळ, उड्या, कुस्त्या, फ़ुगड्या खेळल्या जातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्यात ...
पुढे वाचा. : गोकुळअष्टमी