के. के. मेनन ह्या नटाच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा लेख लिहीतांना त्याच्या शिक्षणाचा गौरवाने उल्लेख करणे हे समजू शकते. पण त्याबरोबर चित्रपटस्रुष्टीतील इतर कलाकारांच्या नसलेल्या शिक्षणाचा हेटाळणीयुक्त उल्लेख करणे हे तुम्हाला लेखाच्या विषयाशी संबंधित आहे असे वाटत असेल, तर माझा प्रतिसाद अजिबात असंबंद्ध नाही.

गदिमा व इतरांच्या नावांची जंत्री तुम्हीच आता दिलीत ते ठीकच झाले. सहामुभुती नको म्हणा, हरकत नाही. पण हेटाळणीही नको ना? वर ज्या तऱ्हेने कपूर खानदान, कुणी एक तिचा जमाना तिच्या अभिनयाने गाजवलेली नटी ह्यांच्या उल्लेखाचा जो सूर आहे, त्याला सर्वसामान्य माणसे असेच म्हणतात. "...त्यामुळे कलाकाराने उच्चशिक्षित वगैरे असले पाहिजे असे प्रस्तुत लेखकाचे मुळीच म्हणणे नाही. लौकिकार्थाने काहीही शिक्षण न घेता आयुष्याला सर्वार्थाने भिडलेल्या कलाकारांनी आभाळाएवढे 'परफॉर्र्मन्सेस' दिले आहेत". ही उपरती झाल्याबद्दल धन्यवाद.

मी दिलेला दुवा आणि 'काही जुने हिशेब चुकवणे' ह्यांचा कसलाही संबंध समजला नाही. कारण एकतर तुमचे व माझे असे काही 'जुने हिशेब चुकविणे' आहे, हेही ज्ञान मला आता तुमचा प्रतिसाद वाचल्यावरच झाले. दुसरे, तसे काही असलेच तरी असले काही करत उपद्व्याप बसण्याची माझी मानसिकता नव्हती व नाही. हे 'केसाळ काळे कुत्रे' वगैरे लिहून तुम्ही चोख उत्तर देण्यातून पळवाट काढलीत, कारण तिथेही तुमची त्या कलाकाराविषयीची तुच्छतापूर्ण वागणूक लख्ख उघड आहे.