महाविद्यालयातून बाहेर पडताना माझे वजन पन्नास किलो होते. गेली पंचेचाळीस वर्षे तरी हे वजन जवळ जवळ तसेच आहे. (आता थोडे कमी झाले आहे). माझ्या लग्नात शिवलेला कोट अजूनही सुस्थितीत असून तो मी वापरू शकतो. खाणे तसेही फार मर्यादित आहे. पण सकाळी पाच सात मिनिटे सगळे सांधे ढिले करणाऱ्या हालचाली दिवसभर तवाने ठेवतात, हा माझा अनुभव आहे.