हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना  शिक्षण, वाचन, लेखन याचे बऱ्यापैकी वावडे आहे. संस्कारांचे तर आहेच आहे.
या वाक्याबाबतच प्रदीप यांची आदळाआपट आहे असे वाटते. तर यावर माझे उघड उघड आव्हान असे की प्रूव्ह इट अदरवाईज. न्हाव्याला गणपतीच्या मूर्ती करता येत नाहीत किंवा एखाद्या दूरदर्शन तंत्रज्ञाला आपल्याला काय म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दांत सांगता येत नाही, असे जर एखाद्याने विधान केले तर ते तसे नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी तसे ज्याला वाटते त्याची आहे. यात 'हॅ! हा कसला न्हावी! धड एक गणपतीची मूर्ती करता येत नाही! ' असा खवचटपणा एखाद्याला दिसला तरे ते चष्म्याचा नंबर बदललेल्याचे लक्षण आहे.
आयुष्याला सर्वार्थाने भिडलेल्या कलाकारांनी आभाळाएवढे 'परफॉर्र्मन्सेस' दिले आहेत". ही उपरती झाल्याबद्दल धन्यवाद
ही उपरती नाही. मूळ लेखातील सूर तसाच आहे, फक्त सुजाण वाचक दोन ओळींमधला मजकूर वाचू शकतो, जातीवंत टीकाकाराला मूळ ओळीच दिसत नाहीत हा फरक आहे.गदिमा व इतरांच्या नावांची जंत्री तुम्हीच आता दिलीत ते ठीकच झाले. सहामुभुती नको म्हणा, हरकत नाही. याला म्हणतात उपरती.
हे 'केसाळ काळे कुत्रे' वगैरे लिहून तुम्ही चोख उत्तर देण्यातून पळवाट काढलीत, कारण तिथेही तुमची त्या कलाकाराविषयीची तुच्छतापूर्ण वागणूक लख्ख उघड आहे.
ज्या संकेतस्थळाचा दुवा दिलेला आहे, त्या संकेतस्थळावर टीका वर्ज्य नाही. 'अहो रुपम, अहो ध्वनी' प्रकारच्या संकेतस्थळावर अशी विधाने वादग्रस्त होऊ शकतात. जेथे चर्चा, वाद आणि म्हणून 'माहितीची देवाणघेवाण' अपेक्षित आहे, तेथे टीका, क्वचित खवचट टीकाही स्वीकारली जाते. गोड गुलाबजांबू बॅडमिंटनची अपेक्षा ठेवणाऱ्यांना तेथे त्रास होणे स्वाभाविक आहे.
तसे काही असलेच तरी असले काही करत उपद्व्याप बसण्याची माझी मानसिकता नव्हती व नाही
ते तर (कदाचित ज्याबाबत स्वतःच साशंक आहोत अशा) 'वादासाठी वाद' म्हणून वाढवलेल्या प्रतिसादांतून दिसतेच आहे.