हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना शिक्षण, वाचन, लेखन याचे बऱ्यापैकी वावडे आहे. संस्कारांचे तर आहेच आहे.
या वाक्याबाबतच प्रदीप यांची आदळाआपट आहे असे वाटते.
तुम्हाला तसे सोयिस्करपणे वाटते आहे.
शिक्षणाचे वावडे आहे, हे तुम्ही कसे ओळखलेत? आणि जरी तसे असले, तरी त्याचा इथे उल्लेख करण्याचे काय प्रयोजन? अनेक माणसे परिस्थितीच्या रेट्यापुढे शिक्षण घेऊ शकत नाहीत-- परिस्थितीचा रेटा हा नुसता आर्थिक निष्कर्षांवरील नव्हे, तर इतर व्यवधानेही असू शकतात. मुळात प्रत्येकाने फॉर्मल शिक्षण घेतलेच पाहिजे हा आग्रह ह्यातूनच दिसत नाही का?
"कपूर खानदानातला पहिला पदवीधर कोण? रणवीर कपूर? चिकित्सकांनी अधिक शोध घ्यावा) अमिताभ बच्चन, बलराज सहानी, नसिरुद्दिन शाह वगैरे अपवादच. अन्यथा गेल्या जमान्यातली एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते तसे. 'पुस्तक? मी तर आयुष्यात एकही पुस्तक वाचेलेले नाही! ' आणि ही अगदी यशाच्या शिखरावर वगैरे पोचलेली अभिनेत्री. "
हे तुम्हीच ह्या लेखात लिहीले आहेत ना? तेव्हा कुणाच्या डिग्र्या तपासण्याचा प्राध्यापकी उपद्व्याप करण्याची जरूरी काय दर्शवते?
ज्या संकेतस्थळाचा दुवा दिलेला आहे, त्या संकेतस्थळावर टीका वर्ज्य नाही.
त्या तुमच्या ढळढळीत कुत्सितपणाचा जाब तेथेच विचारणे जास्त रास्त होते हे कबूल. पण ते न करण्याचे कारण प्रत्येकाने लिहीलेल्या प्रत्येक बाबीवर चर्चा करण्यात वेळ जातो हे आहे. पण तोच कुत्सित्पणा आता येथे परत तुमच्या लेखात होत आहे, असे वाटले म्हणून येथे त्या तुमच्या प्रतिसादाचा दुवा दिला आहे. त्याला तुम्ही काय उत्तर देणार?
'अहो रुपम, अहो ध्वनी' प्रकारच्या संकेतस्थळावर अशी विधाने वादग्रस्त होऊ शकतात. जेथे चर्चा, वाद आणि म्हणून 'माहितीची देवाणघेवाण' अपेक्षित आहे, तेथे टीका, क्वचित खवचट टीकाही स्वीकारली जाते. गोड गुलाबजांबू बॅडमिंटनची अपेक्षा ठेवणाऱ्यांना तेथे त्रास होणे स्वाभाविक आहे.
प्रथम तुम्ही तुमच्या व माझ्यातील कुठल्यातरी (असलेल्या अथवा नसलेल्या) वैयक्तिक वादाचा संदर्भ देऊन पळवाट काढलीत. आता इतर वैयक्तिक शेरेबाजी व 'हा वादासाठी वाद' उकरून काढला आहे' असे म्हणत आहात!! मनोगतावर हे मी तुम्हाला येथे विचारत आहे. हे 'अहो रुपम, अहो ध्वनि' अशा प्रकारचे संकेतस्थळ आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? माझ्या टिकेला समर्पक उत्तर देता आले तर पाहावे. अथवा तुम्हाला फक्त वाहवाच मान्य आहे, असे वाटले तर ते चूक मानू नये.