हे तुम्हीच ह्या लेखात लिहीले आहेत ना? तेव्हा कुणाच्या डिग्र्या तपासण्याचा प्राध्यापकी उपद्व्याप करण्याची जरूरी काय दर्शवते?
हे एक विधान (स्टेटमेंट ) आहे, दावा (क्लेम) नाही, हे मी यापूर्वीही लिहिले आहे, पण पुनरावृत्तीचा एकाधिकार तुम्हालाच मिळावा, हे मला अमान्य आहे, म्हणून पुन्हा (माझेही) तेच.
त्या तुमच्या ढळढळीत कुत्सितपणाचा जाब तेथेच विचारणे जास्त रास्त होते हे कबूल.
आपले शब्द मागे घेऊन ते गिळून टाकण्याची या वादातली तुमची ही दुसरी वेळ. चालू द्या. या न्यायाने कधीतरी पूर्ण प्रतिसाद मागे घेण्याचेही तुम्हाला सुचेल.
मनोगतावर हे मी तुम्हाला येथे विचारत आहे. हे 'अहो रुपम, अहो ध्वनी' अशा प्रकारचे संकेतस्थळ आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
हा हा. मला काय म्हणायचे आहे, हे तुम्हाला नक्की कळाले आहे, पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही!
माझ्या टिकेला समर्पक उत्तर देता आले तर पाहावे. अथवा तुम्हाला फक्त वाहवाच मान्य आहे, असे वाटले तर ते चूक मानू नये.
जरुर तसे म्हणा. माझ्या परीने मी तुमच्या तथाकथित टीकेला उत्तरे दिली आहेतच. सामान्यतः अशा वादात एकाने 'मी माझ्या बाजूने हा वाद संपवत आहे' किंवा 'हा माझा शेवटचा प्रतिसाद' असे म्हणण्याची पद्धत आहे, पण या वादाचा सूर बघता मी तसे म्हणणे म्हणजे मी माघार घेणे असा अर्थ तुम्ही काढणार, याची कल्पना आल्याने मी माझ्या बाजूने हा वाद खुला ठेवत आहे.