श्री. विनायक,

राज कपूरला शेवटी मार्ग मिळाला आणि त्याने त्यावरून जाऊन, वैध रित्या (कुठलेही अवैध काम न करता) सोने करून दाखवले, ही बॉटम लाईन महत्त्वाची. हीच गोष्ट साहिरविषयीही म्हणता येईल. संधी मिळावी लागते हे खरे, पण ती मिळाल्यावर तिचा फायदा करून घेणे हे त्या व्यक्तिच्या त्या कार्यक्षेत्रातील क्षमतेवर अवलंबून असते. ह्या दोन्ही केसेसमध्ये हे झालेले आहे, हे तर आपण नाकारू शकत नाही. जगात फॉर्मल शिक्षण न घेताही आयुष्यात वैध मार्गाने खूप काही मिळवणारी माणसे खूप आहेत. ही सगळी माणसे आपल्या क्षेत्रातील शिक्षण 'ऑन द जॉब' घेत असतात. मग ते रेस्टॉऱॉ चालवणारे असोत किंवा चित्रपट दिग्दर्शक असोत, किंवा अगदी नाटककारही असोत.  त्यांना त्यांचे क्षेत्र मिळाले (they found their calling)  व तेथे त्यांनी आपली चमक दाखवली. ह्या दरम्यान त्यांनी त्या त्या क्षेत्रात शिक्षण घेतलेच की.