१. आयसोसायनाईड या विषारी वायूमुळें लोक मेले असें मीं वर्तमानपत्रांत वाचलें आहे. तें खरें असेल असें मीं मानतों.
   CH3NC हें त्या वायूचें सूत्र आहे.
   य वायूचें होमातील ज्वालेच्या उच्च तपमानामुळें ऑक्सिडीकरण झालें असें मानलें तरी CO + CO2 + H2O + NO + NO2 इ. द्रव्यें निर्माण       होतील.  वाचलेल्या माणसांसाठीं ऑक्सिजन कुठून उपलब्ध झाला होता वा त्या माणसांनीं गॅस मास्क वा ऑक्सिजनचा पुरवठा वापरला होता काय याचें स्पष्टीकरण नाहीं. त्यामुळें वरील घटनेच्या सत्यतेबद्दल शंका येणें क्रमप्राप्त आहे.

२. होमाच्या प्रभावक्षेत्राभोंवतालचीं इतर माणसें जिवंत होतीं कां? भोंवतालची इतर माणसें जर वाचलीं असतील तर कशामुळें वाचलीं असतील याचें शास्त्रीय स्पष्टीकरण दिलेलें नाहीं. ही बातमी इतकी वर्षें कां उजेडांत आली नाहीं? या घटनेचे साक्षीदार कोण आहेत याबद्दल कांहींही वरील लेखांत लिहिलेलें नाहीं.

३. बातमीचा स्रोत कोणता व त्याची विश्वासार्हता किती याबद्दलही कांहींही टिप्पणी नाहीं.

त्यामुळें गणपती दूध पितो वा माहीम खाडीचें पाणी गोड झालें या प्रकारची ही घटना असावी असें वाटतें. लेखकावर व्यक्तिगत हल्ला चढवायचा माझा हेतू नाहीं. पण तर्कसंगत असें जें वाटलें तें लिहिलें. वाईट वाटल्यास क्षमस्व.

सुधीर कांदळकर.