कुणी काहीही म्हणोत, पुण्यात सकाळला आणि मुंबईत लोकसत्ताला पर्याय नाहीत. इंग्रजी वर्तमानपत्रात काहीही 'मराठी' नसते.  ती पत्रे केवळ कमी पैशात जास्त रद्दी जमवण्यासाठीच्या उपयोगाची.

सकाळमध्ये सुधारणा हवी असेल तत, सकाळमधले आपल्याला कायकाय आवडत नाही त्याची यादी करून सकाळला पाठवावी. मला काय आवडत नाही? तर कोटीच्या बातम्या. उदा. "केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ. यामुळे सरकारच्या तिजोरीला १७, ३७२ कोटींचा भुर्दंड!"  "रेशनवर महिन्याला कुटुंबी ३५० ग्रॅम तूरडाळ मिळणार, राज्य सरकारवर १२२ कोटींचा बोजा." "नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे एकाचा मृत्यू आणि पिकांची हानी.  किमान १००० कोटींचे नुकसान." " विमान अपघातात १२ ठार. विमा कंपनीचे २४ कोटीं रुपये बुडणार!" इ.इ. त्यामुळे 'कोटी' दिसला की मी बातमी वाचायचे टाळलेच म्हणून समजा.