युनियन कार्बाईडच्या दुर्घटनेत कुणाला यज्ञामुळे जीव वाचवता आला की नाही हा प्रश्न निश्चीतच वादोत्पादक ठरू शकेल. कारण संजोप राव म्हणतात त्या प्रमाणे भुकेली माणसे असणाऱ्या या देशात अंधश्रद्धा व अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य दोन्ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वाद होऊ शकेल.
परंतु यज्ञाचे फायदे खालील असतात असे वाचलेले तरी आहे.
१. हवा शुद्ध होते.
२. वास्तू शुद्ध होते ( दोन्ही गोष्टींना उघड कारणेच आहेत. अतर्क्य काही नाही. )
३. मनस्थिती पवित्र होते - याचा कारण यज्ञाचा 'ईशप्रार्थनेशी' संबंध आहे हे सांगीतले गेले आहे. कुणी नुसतेच समिधा जाळत बसले, घरातील स्त्री त्याचवेळी ऑम्लेटस टाकत असली, आजोबा बिडी मारत असले अन पोरे मटण आणायला बाजारात गेलेली असली व कुणाच्याही मनात ईश्वराबद्दल आदर / भक्ती नसेल तर त्या यज्ञाचा मनस्थितीवर काहीही परिणाम होऊ शकणार नाही असे वाटते. ते मानसिक आहे.
अनुभव :
१. यज्ञामुळे डोळ्यांची प्रचंड आग ( गुरुजींच्या सोडून ) होऊन त्यातून पाणी येऊन ते स्वच्छ होतात.
२. चार टाइल्स व आढ्याचा काही भाग कायमचा काळा होतो.
३. आजूबाजूचे पहिल्यांदा खिडकीतून येणारा धूर पाहून अंतर्बाह्य हादरतात व सौभाग्यवतींकडून होमाची बातमी समजल्यावर "काय धूर धूर होतोय" म्हणतात.
४. आपले काही नातेवाईक व शेजारी पाजारी आपल्याकडे पुढील काही दिवस आदराने बघतात. नंतर काही इतर प्रकार घडल्यावर पुन्हा पहिल्यासारखे वागू लागतात.
५. गुरुजींची एकाधिकारशाही होम विझेपर्यंत चालू असते.
६. पुढचा पंधरवडा "हा यज्ञाचा परिणाम" असे म्हणण्यात जातो व नंतर "आपले यज्ञात काहीतरी राहून गेले असावे" असे म्हणणे सुरू होते.