श्री. संपाद्क,
खीरीच्या शेवया अगदी बारीक असतात. त्या साठी यंत्र विकत घ्यावे लागते. दिड-दोन हजारापर्यंत मिळत असावे.
चार कप मैद्यात एक अंडे, चवीपुरते मिठ आणि दोन टेबलस्पून तेल घालून पीठ पाण्यात घट्टसर भिजवावे. आधी यंत्राच्या दोन दंडगोलातून (रोलर्स) मैद्याचा गोळा सरकवून (बाजूला असलेले हँडल फिरवून) चप्पट पोळी करून घ्यावी. नंतर ती पोळी शेवयांच्या दातेरी दंडगोलांतून फिरवून शेवया कापून घ्याव्यात. त्या एकमेकांना चिकटणार नाहीत अशा तऱ्हेने लाकडी दांडीवर सावलीत वाळवून घ्याव्यात. त्या तशा संपूर्ण वाळल्या की आपल्या शेवया तयार झाल्या.
घरगुती पाकक्रियांसाठी (कमी प्रमाणात लागत असल्यामुळे) बाजारातून तयार शेवया आणणे केंव्हाही किफायतशीर आणि वेळेची बचत करणारे असते. शिवाय बाजारात मिळणाऱ्या शेवयांइतक्या बारीक शेवया घरी करता येत नाहीत. घरी, फालुद्याला लागणाऱ्या (त्या मानाने जरा जाड) शेवया, 'चायनीज' साठी नूडल्स करणे शक्य होईल.
धन्यवाद.