पूर्वी इंग्रजी टाइम्समधील स्पेलिंगची चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा असे होते म्हणे आता प्रत्येक पानावर स्पेलिंगचीच काय पण वाक्यरचनेच्याही चुका असतात.
बक्षीसयोजनेबद्दल कल्पना नाही, परंतु स्पेलिंग, वाक्यरचना एवढेच नव्हे तर शब्दप्रयोगांच्याही चुका हा प्रकार आता तेवढाही नवीन राहिलेला नाही.
१९८० सालानंतरच्या दशकात एकदा लेबॅननमधील पॅलेस्टिनी छावण्यांवर इस्राएलने हल्ला केला होता. त्यावेळी तेथे भेट देत असलेले पॅलेस्टीन मुक्तिसंघटनेचे नेते श्री. यासर अराफत हे थोडक्यात वाचले होते. ही बातमी केवळ टाइम्सने 'मिस्टर यासर अराफत एस्केप्ड अनहार्म्ड'ऐवजी 'मिस्टर यासर अराफत एस्केप्ड हार्मलेस' अशी दिल्यामुळे आजपर्यंत लक्षात राहिली आहे.