शिक्षण घेत असताना एखाद दुसऱ्या मार्काने आपली स्कॉलरशीप जाते....
पण शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण होण्याची संधी तर आपल्याला मिळते!

आपण खूप इमाने इतबारे नोकरी करतो.... पण प्रमोशन, ऑनसाईट अश्या सगळ्या संध्या आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना मिळतात....

इमानाने नोकरी केल्याचे समाधान तर कुठे जात नाही.

नेहमी मनोभावे देवाची पूजा करतो... व्रत-वैकल्ये करतो...तरी रिसेशन मध्ये नोकरी जाण्याचा अनुभवही देव आपल्याला देतो....
काही कटू अनुभवच तर जगण्याचे बळ देतात..

पैसे साठवून आपण शेअर मार्केटमध्ये नशीब आजमावायचा प्रयत्न करतो.... तिथेही नुकसानच वाट्याला येते....
शेअर बाजारात फार पैसा गुंतवू नये हा धडा तर मिळतो.

नवीन घर घेऊन काही सोयी करून घ्यायच्या तरी, रंगाऱ्यापासून प्लंबरपर्यंत सगळेच आपल्याला ह्या न त्या मार्गाने फसवतात...
निदान नवे घर घेण्याची ऐपत तर आहे आपली!

कधीही आपण कुणाच्या सुखावर जळत नाही... की कुणाचे वाईट व्हावे अशी इच्छा करत नाही.... तरी हे सगळे आपल्याच वाट्याला का येते???
कारण ज्या झाडाला जास्त फळे लागतात, त्यालाच सगळ्यात जास्त दगड खावे लागतात !

अवांतर- आपण ज्या बसने हनिमूनला जातो.. नेमकी त्याचीच गाईड 'प' निघते.. हे राहिले का? हलकेच घेशील!!