उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

लहानपणी बरीच वर्षं "घरातला बागुलबुवा" म्हणून अण्णा आजोबांचा वापर होत असे.मोठ्यांना उपद्व्याप होईल अशी कुठलीही गोष्ट करायचा बेत केला की " अण्णा रागवतील" ही सबब सांगून अज्जी आणि मामी आम्हाला कटवत असत. पण अण्णा आजोबांचा अभ्यास करायला मला फार आवडायचे. रोज सकाळी चार वाजता उठून आजोबा वाचन आणि लिखाण करीत असत. "कुसूम" अशी खणखणीत हाक पहाटे चार वाजता आमच्या कानावर पडत असे. मग अज्जी खूप केविलवाण्या आवाजात, "आले हो. हाक मारू नका एवढ्यानी, मुलं झोपलीत"!" असं म्हणायची. मग मुलांनी सुद्धा कसं चार वाजता उठलं पाहिजे यावर ते त्याहीपेक्षा जोरात भाषण द्यायचे. ...
पुढे वाचा. : अण्णा आजोबा