स्मृति येथे हे वाचायला मिळाले:








गणपतीचे दिवस जवळ आले की पुण्यातले खाऊवाले पाटणकर यांचे माझ्या बाबांना एक पत्र यायचे की "पेणवरून गणपतींच्या सुंदर व सुबक मूर्ती आल्या आहेत."

गणपतीच्या दिवशी सकाळी आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर गणपती आणायला जायचो. बाबांच्या हातामध्ये ताम्हण व त्यात आमच्या गणपतीची सुरेख मूर्ती असायची. त्या गणपतीचे डोळे रेखीव व बोलके असायचे. त्याच्याकडे पाहिले की तो आपल्याकडे बघून हसतो आहे की काय असा भास व्हायचा. शेंदरी रंगाचे पितांबर आणि आकाशी रंगाचे उपरणे. सोंडेवरचे नक्षीकाम जणुकाही चांदी सोन्याचे आहे की काय असे वाटे. ...
पुढे वाचा. : आठवण गौरीगणपतीची