ज्यागोष्टी आपल्या सबकॉन्शस मनात असतात त्या त्या प्रत्यक्ष घडतात.
ह्या सगळ्या गोष्टी आपणच घडवून आणत असतो. यश आपल्याला हुलकावणी देणारच हे तुमच्या अंतरमनात (सबकॉन्शस माइंड) पक्कं बसलेलं आहे ते आधी धुवून काढलं पाहिजे. मग बाह्य मनाला (कॉन्शस माइंड) कितीही वाटलं तरी जे आतपर्यंत पोचलेलं आहे तेच घडणार.
अंतरमन आणि इच्छाशक्ती (विलपॉवर) ह्यांचा वापर कसा करायचा ह्यावर अनेक पुस्तकं आहेत, त्यातून बरीच माहिती मिळू शकते.