हा आता धड वादाचा विषय नाही की विश्वासाचा. सुधीरजींना वाटते तसे सखोल अन्वेषण करूनच या कर्मांची उपयोगिता सिद्ध होणारी आहे. पण जे पाश्चात्य तंत्र जाणतात, त्यांचा या विषयांशी संवंध येतो तो टीका करण्यापुरता. तसे पाहिले तर आमचा धर्म जे आचार सुचवितो, त्यांमागे जीवांचे कल्याण हा हेतू आहे. त्यात निसर्गाचाही समावेश आहेच. मला वाटते की या विषयांवर संशोधन करून जे विधायक ते माहिती करून देणारा आधुनिक ऋषी असेल. दारिद्र्य किंवा पर्यावरण ऱ्हास यास मानवी चुकाच कारणीभूत आहेत. यालाच धर्मच्युती म्हणता येते.