याचा मनाशी ठाम निर्णय व्हायला हवा. देव ही एक शक्ती आहे तर मग माझ्यातले शारीरिक तसेच मानसिक बल सुस्थापित असेल तर देव वेगळा राहात नाहीच. आजूबाजूला पाहिले तर आपल्याला जे दिसते त्यातून हे प्रत्ययाला येते. तुमचे व्यक्तीमत्व ज्यात शारीरिक ठेवण आणि चेहऱ्यावर दिसणारा प्रखर आत्मविश्वास अंतर्भूत असतो, त्यामुळे बहुधा मनाची पिळवणूक वाट्यास येत नाही.