अश्वं नैव गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च ।
अजापुत्रं बलिं यच्छेत् देवोदुर्बलघातकः ॥

म्हणजे

घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर मुळी कधीच नाही ।
बकरा चाहतो बळीचा, देव तर दुर्बळ घातकी ॥

अर्थात सामर्थ्यवान प्राण्याचा बळी कधीही न मागणारा देव, असमर्थ बकऱ्यालाच बळी म्हणून चाहतो.

तेव्हा सामर्थ्याची साधना करावी. सशक्त व्हावे. सिद्ध व्हावे. हेच बरे.
मग देवच काय पण दैवही धार्जिणे होतांना दिसून येईल.