'पुण्याच्या किंवा एकंदर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत 'सकाळ' चा फार महत्त्वाचा वाटा आहे'... यातील सांस्कृतिक म्हणजे नेमके काय हे मला आजही समजत नाही. पण  'वाचक हा निव्वळ 'तिसरी ब' मधला विद्यार्थी' हे माझ्याकरिता तरी खरे आहे कारण माझ्या वाचन-लेखनाचा श्रीगणेशा आईने सकाळवरूनच करून दिलेला आहे. मग मी एकदम दुसरीची परीक्षा दिली व पुण्याच्या नूमवीत सरळ तिसरीत प्रवेश घेतला.