मला वाटतं, आपले हे विचार तत्कालीन नैराश्यातून निर्माण झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही आजवर तुमच्यासोबत झालेल्या फक्त वाईट गोष्टींचा विचार केलाय.
कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप जास्त अपेक्षा असते आणि ती पूर्ण होणारच असा थोडासा अती-विश्वास असतो. पण जेव्हा अपेक्षाभंगाची वेळ येते तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की आपल्यासोबत कायम आणि सगळंच चुकीचं घडतं. इतर वेळी आपल्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, खूपदा अनपेक्षित सुख मिळतं. पण हे आपल्याला त्या निराशाजनक वेळी आठवत नाही. ते चूक आहे असे अजिबात नाही, माझ्या मते ते अगदी नैसर्गिक आहे. सगळ्यांसोबतच असं होत असावं. माझ्या बाबतीत तरी तसंच होतं.
असा निराशावादी विचार सोडून आशावादी दृष्टिकोन कसा ठेवावा हे बाकीच्यांनी आधीच सांगितलंय... मी पुन्हा तेच लिहीत नाही. फक्त एकच सांगणं आही की सकारात्मक राहा