मला वाटतं आपण चांगल्या अनुभवांची नोंद ठेवीत नाही. मात्र एखाददुसराही वाईट अनुभव आला की आपण "सालं आपलं नशीबच खराब" म्हणून (न चुकता) कपाळावर हात मारतो. ज्या प्रयत्नांचा शेवट अनिश्चित असतो ते करीत असतांना "सालं आपलं नशीबच खराब" ही ओळ पार्श्वसंगीतासारखी आपल्या मनात वाजत राहते व ती अधोरेखित करण्यासाठी आपण ऐनवेळी प्रयत्नांतून (कळत-नकळत) माघार घेतो व त्यातील कल्पना खरी करून दाखवतो. याला  self fulfilling prophecy  असे म्हणतात. यावर उपाय म्हणजे आपल्याला आलेले चांगले यशाचे अनुभव आठवत राहणे व नकारात्मक ओळ वाजू लागण्याची शंका आल्यास ती प्रयत्नपूर्वक नाकारून "आपण नशीबवान आहोत"  या अर्थाचे पार्श्वसंगीत सतत मनात वाजवणे. सुरवातीला हे प्रयत्नपूर्वक करावे लागेल. पण नंतर तो सवयीचा भाग होईल.