स्मृति येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वी मामेबहिणींच्या मंगळागौरीला केलेले जागरण आठवले. भरपूर खेळता यावे म्हणून कार्यालय घेतले होते. त्यामध्ये रात्रभर जागरण. फेर धरून विविध गाणी व अनेक खेळ. गाठोडी व सुपारी, झिम्मा, फुगड्या, उखाणे घेणे. त्यामध्ये एक गाणे असे होते. २ गट पाडायचे. एका गटानी संथ व दुसऱ्या गटाने जलद, परत पहिल्या गटाने अतिजलद असे ते एकच गाणे म्हणायचे टाळ्या वाजवत. ते गाणे असे. यमुनेच्या काठी किती बुलबुल असतील, बुलबुल असतील १ तरि २ तरि ३ तरि असतील, ४ तरि, ५ तरि ६ तरि असतील, ७ तरि ८ तरि ९ तरि असतील, १० बुलबुल हो हो हो.

बहुतेक अन्नपूर्णा देवीची पूजा करतात व ...
पुढे वाचा. : मंगळागौर - एक आठवण