मनोगतावर इनस्क्रिप्टाचा आराखडा वापरून का लिहता येत नाही?
मला असं आढळलं आहे की इनस्क्रिप्टाचा आराखडा वापरून मनोगतावर लिहिता येत नाही. माझ्यासारख्या माणसाला त्यामुळे इच्छा असूनही फार वेगाने लेखन करता येत नाही. इंग्रजी उच्चाराला अनुसरत रोमी लिपीत लिहिणारांची जशी सोय पाहिली जाते तशी थेट इन्स्क्रिप्टात लिहिणाऱ्यांचीही पाहता येईल का? त्याचाही पर्याय उपलब्ध करता येईल का?