मनोगताच्या लिप्यंतर सुविधेऐवजी इतर टंकलेखन सुविधा वापरताना मनोगताची लिप्यंतर सुविधा बंद करावी लागते. आपण जेव्हा लिहिण्याचा रोमन पर्याय स्वीकारतो तेव्हा हे लिप्यंतर बंद होते. कंट्रोल-टी दाबून किंवा उजव्या स्तंभात सर्वात वर दिलेल्या मांडणीत हवे ते बदल करून लिप्यंतर बंद किंवा सुरू करता येते.