ऍ हे अक्षर भारतातील फक्त मराठी लिपीत आहे; इतर दाक्षिणात्य वा उत्तरेकडील लिप्यांत नाही.बरोबर. हिंदीत ऍ ऐवजी ए वापरतात, ऑ ऐवजी आ. उदा. एटम बम, बैंक आफ़ इंडिया. सुनील दत्त 'ब्लडी फ़ूल'ला 'ब्लेडी फ़ूल' म्हणायचे. ते आठवले. हिंदी कांदबऱ्यांत येणारे इंग्रजी शब्द वाचताना फार मजा यायची.
मराठी भाषेसाठी असंख्य टंक आहेतमाझ्या अतिशय जुजबी 'ज्ञाना'नुसार तुम्ही म्हणता ते श्रीलिपी, आकृती वगैरे ऍस्की टंक असावेत. देवनागरी युनिकोडमध्ये हिंदी आणि मराठीसाठी लागणारे सर्व अक्षरचिन्हे/अक्षराकार समाविष्ट करून घेता येतील असे वाटते. वाट पाहणे तेवढे आपल्या हातात असावे. ह्याबाबत जाणकरांनी अधिक माहिती दिल्यास आवडेल.