अलपिस्टनसाहेब(एलफिन्स्टन-मुंबई प्रांताचा एक सज्जन आणि शिक्षणप्रिय माजी गव्हर्नर. ज्याच्या नावाने एलफिन्स्टन रोड आहे तो. )

'अळुपिष्टन' साहेबाबद्दल ऐकले होते.

मात्र शिक्षणप्रेमी अळुपिष्टनसाहेब आणि ज्यांच्या नावे एल्फिन्स्टन रोड आहे तो अळुपिष्टनसाहेब या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात असे (विकीवरील माहितीवरून) वाटते. दोघेही वेगवेगळ्या वेळी मुंबई प्रांताचे गौरनर होते असे कळते.

शिक्षणप्रेमी अळुपिष्टनसाहेब म्हणजे मौंतस्त्युअर्त अळुपिष्टन. स्टेशन ज्यांच्या नावे बांधले तो लॉर्ड जॉन अळुपिष्टन. मौंत्यस्त्युअर्तसाहेब हे जॉनसाहेबांचे बहुधा काका असावेत असे वाटते. (चूभूद्याघ्या. विकीवरील दुव्यात जॉनसाहेबांचा उल्लेख मौंतस्त्युअर्तसाहेबांचे nephew म्हणून केलेला आहे. नेमक्या नात्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.)

एल्फिन्स्टन कॉलेज मात्र शिक्षणप्रेमी मौंतस्त्युअर्तसाहेबांच्या सन्मानार्थ बांधलेले आहे, असे कळते.