हा चुकीचा शब्द असावा. भारतीय पौराणिक कोशात 'सुवर्चला' असे नांव आहे. तिचा मारुतीशी कांहीही संबंध दिलेला नाही. ती १) ऋषभदेववंशीय परमेष्ठीची पत्नी, २) ऋषभदेववंशीय प्रतीहाची स्त्री, ३) आदित्याची पत्नी, ४) एक देवकन्या. ही ब्रह्मविद्यासंपन्न होती. हिच्या प्रश्नाचीं उत्तरें उद्दालकपुत्र श्वेतकेतूने दिल्यामुळे त्याला हिने वरले होतें - अशी माहिती दिलेली आहे. त्यातच पुढे 'सुवर्चा' हा रामाच्या प्रधानाचा नातू, असा उल्लेखही आहे.
         रामायणाची अनेक आख्याने वेगवेगळ्या देशात/प्रदेशात उपलब्ध आहेत. अशाच एखाद्या आख्यानातील आधार हनुमान-सुवर्चला संबंधाकरता घेतला असावा, असे वाटते. रावण-सीतेच्या वेगवेगळ्या नात्यांबद्दलही असाच प्रवाद ऐकावयास मिळतो.