सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनापासून आभार....
खरं सांगायचं तर मी जराशी वैतागले होते..... ऑफिस, आणि इतर गोष्टींना.... आणि त्या परिस्थितीतच मी हा विषय मांडला.... खरे पाहता मी सुद्धा आशावादी आहे.....
पण मी मांडलेल्या ह्या विषयामुळे आज आपणा सर्वांमधले आशावादी विचार लेखनाच्या स्वरुपात बाहेर आले आहे.... अन्यथा हे विचार विनाप्रश्न इथे मांडले गेले नसते नाही का???
आपले सर्वांचे इतके पॉझिटीव्ह विचार एकत्र आल्याने सणाच्या दिवसात वातावरणात... निदान आपल्या आजुबाजुला तरी अजून .१% अधिक पॉझिटीव्हीटी निर्माण झाली असेल अशी आशा आहे....
योगप्रभू : आपल्या गोष्टीने खूप मोठा बोध दिला आहे..... आभार!!
शाहिस्तेखान: मी खुप मोठ्या गॅप नंतर (जवळ जवळ दीड वर्षांनी) लिहुनही तुम्ही मला/माझ्या लिख़ाणाला स्मरणात ठेवले आहे...मनापासून आभार.... "प" वाला विषय हे लिहिताना आठवला नाही.... मी परत लिहीण्यास आल्याबद्दल आपल्याला आनंद वाटला असेल अशी आशा....
नरेंद्र गोळे : खुप आभार... आपल्याला सुभाषितामधून जे सांगायचे होते ते आता आमच्या मनात आम्ही पक्के बसवले आहे...
विजय देशमुख : आपलाही द्रुष्टीकोन योग्य आहे... पण कधी कधी आपण आपल्याच आयुष्यात इतके गुरफटून जातो की जे आहे त्या पेक्षा जे नाही ते जास्त प्रभावीपणे दिसू लागते.... आणि नकारात्मक गोष्टींचा पगडा आपल्या मनावर पकड घेतो.... मग सकारात्मक गोष्टी प्रबळ व्हायला आपल्यासारख्या दोस्तांची आणि त्यांच्या विचारांची गरज भासते.... ते आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खुप आभार...
स्मिता१ : धन्यवाद....
भूषण कटककर: थँक्स.... शाहिस्तेखान ह्यांनि लिहिलेले "प" चे गुपित समजण्यासाठी आपल्याला ""एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव"" ह्या अनुभव कथा मालिकेचे ११ भाग वाचावे लागतील.... जे मार्च २००८ ते एप्रिल २००८ ह्या काळात मनोगतावर लिहिले आहेत.... ते तुम्हाला खालील लिंक वर सापडतील.... जरुर वाचा... आपलीही प्रतिक्रिया वाचायला आम्हाला आवडेल....
शरद कोर्डे , यशवंत जोशी , सौरभ२००९ , बाल सांदीपानी आपलेही मनापासून आभार....
प्रज्ञा गोसावी-रास्ते.