आपल्याला आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या १४ भाषा येत नाहीत याचा कमीपणा वाटत नाही पण इंग्रजी आले नाही तर मात्र आपण फारच बावळट वगैरे ठरतो. मला बंगाली येत नाही किंवा गुजराथी येत नाही तर ती आपली भाषा आहे का? आणि इंग्रजी काय ? ती तर आपल्या देशाचीच भाषा नाही. पण हा न्यूनगंड मराठी माणसात जरा जास्तच दिसतो. म्हणून तर या महाराष्ट्रात मराठीसाठी घसा फोडून ओरडावे लागते. आपल्या भाषेचा अभिमान धरा हे सांगावे लागते.