'प्रमथ' याचा मला महिती असलेला अर्थ 'शारिरीक बळ असलेला' असा आहे. म्हणजेच अशा शारिरीक बळ असलेल्यांचा प्रमुख असा अर्थ आहे. शिवाय मोनिएर विल्यम्स या शब्दकोषात 'प्रमथ' या शब्दाचा अर्थ...क्लास ऑफ डेमन्स अटेंडिंग ऑन शिव' असा आहे. थोडक्यात गणपती असाच त्याच अर्थ आहे. ब्राह्मणाचा इथे काहीही संबंध नाही.
अवांतरः
'मथ' याचा अर्थ घुसळणे असा आहे... या अर्थाचे ब्राह्मणांना काही लागू होत नसावे. गणपतीला काय होते ते मात्र पहायला हवे.