करून गेलो गाव आणि बाबुरावचो नाव येथे हे वाचायला मिळाले:
गणेशोस्तव आला की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं बर्याच लोकांना नवीन असतील. कोकणातील नामशेष होत जाणार्या संस्कृती आणि कलांपैकी ही दोन नावे. कोकणात हा प्रकार अजूनही काही गावात प्रचलित आहे. ह्यात जण ढोलकी घेऊन बसतात आणि काही लोकं ह्यांच्याभोवती फेर धरून नाचतात. नाचणार्यांच्या एका पायात घूंगरू बांधलेले असतात. जसं जसा नाच पुढे सरकत जातो तसं तसा नाचण्याचा आणि फेर धरण्याचा वेग वाढत जातो. मज्जा येते पाहायला. नाचताना उडत्या चालीची गाणी (पारंपरिक गाणी, हिंदी नव्हे) म्हणतात. हल्ली हे कलाकार ...