ZULA येथे हे वाचायला मिळाले:
"महाराष्ट्रदिन' साजरा झाला आणि गावाला "वाढदिवसा'चे वेध लागले. अशीच तयारी शेजारच्या गावातही सुरू होती. ही दोन्ही गावे एकाच दिवशी जन्माला आलेली... गाव जन्माला आला आणि लगेचच, "निर्मलग्राम' स्पर्धेचा लाखाचा पुरस्कारदेखील मिळाला. याच आनंदात गावाने गेल्या 5 मे रोजी दुसरा वाढदिवस साजरा केला. "आमचा गाव' या विषयावर गावात मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा झडल्या. घरोघरी रांगोळ्या सजल्या...