नसीर सारखा अभिनय नसीरच करू जाणे!
नुकताच एक वेग्वेगळ्या गोष्टी गुंफलेला चित्रपट बघितला. नाव आठवत नाही. काही कथा सुमार होत्या. पण त्यातल्या एका कथेत शबानाबरोबर नसीरचा रोल होता. फारच छोटा रोल. शबाना कर्मठ दाक्षिणात्य स्त्री आणि नसीर एक सामान्य सहृदय मुसलमान. अप्रतिम कथा होती. आणि शबाना/नसीरने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली.
नसीरच स्पर्ष आठवला की हटकून अल पचीनोचा "सेंट ऑफ अ वूमन" आठवतो. पचीनोचं ख्रिस ओडोनलला उसळून "आर यू ब्लाईंड? आर यू ब्लाईंड? आय होल्ड यू... " म्हणणं. अगदी थेट नसीरच्या वळणाचं!
नसीरचे बेनेगलबरोबरचे चित्रपट मी अजून पाहिलेच नाहियेत. सरफरोश, इरफान, तीन दिवारे, जाने भी दो, मिर्चमसाला, भोपाळ एक्स्प्रेस, मान्सून वेडिंग...काय काय आठावावे! गालिबच काय, या माणसाने शिवाजीही केला!