या शब्दातील 'प्रमथ' या शब्दाचा अर्थ संस्कृत शब्दकोशाप्रमाणे 'घोडा' असा असून अन्य शब्दकोशात 'शिवाचा एक गण' असा अर्थ पाहावयास मिळतो. प्रमथित म्हणजे चांगले घुसळलेले असा होतो. त्या अनुरोधाने मंथनक्रियेशीही या शब्दाचा संबंध दिसून येतो. विचारमंथन करणारा म्हणून ब्राह्मणाला हा पर्यायी शब्द रूढ केला गेला असेलही. पाठांतरभेदाने 'प्रथमपतये' असेही पद मिळते. अशा अर्थभिन्नतेमुळे 'त्रिवार मी वंदितो तुला' एव्हढेच म्हटले आहे.
सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मंत्रपुष्पांजलीच्या अर्थाविषयी विचार करीत आहे.