प्रेमविवाह करा की नियोजित विवाह करा, तडजोड काही चुकत नाही. आयुष्यात सर्वच क्षेत्रात तडजोड करावी लागते. आपण स्वत:ला कळतनकळत ती करितही असतो. पण संसारातील तडजोड करताना 'स्व' चा अतिरेक आडवा येतो. साथीदारास गृहीत धरलं जातं. आपली मतं, आपले विचार उच्च दर्जाचे मानून साथीदारावर लादण्याचा प्रयत्न होतो. इथे ठीणगी पडते.
लहानपणापासून घरात होणारे, वाचनातून, शिक्षणातून, समाजातून होणारे संस्कार हाडामासाच्या माणसातून 'व्यक्ती' घडवित असतात. एकमेकां बद्दल उचित आदर, मनाचा लवचिकपणा संसारात अत्यंत आवश्यक असतो. कुटूंबातील सर्वजणं ह्या गुणांनी परिपूर्ण असतील तर ते एक सुख़ी कुटूंब होण्याची शक्यता असते.
सुख हे मानण्यावर असतं असं म्हणतात. १९७५ साली युनिसेफ़चा एक फ़लक बघीतला होता. त्यावर इंग्रजी सुभाषीत होतं I always complained that I had no shoes, until I saw a man who had no feet. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
विषय फ़ारच गहन आहे आणि सुखी संसारासाठी जगात कुठेच 'फ़िट फ़ॉर्म्युला' उपलब्ध नाही. पण निराश होण्याचे कारण नाही.......शोध जारी आहे.