ज्या देशात वीस टक्के लोक अन्नपाण्यावाचून, अर्धपोटी जगतात, त्याच देशात बॉलिवूड, हॉलिवूड च्या चित्रपटांची चर्चा, आणि त्यांवरील लेख चालतात, पण त्याच देशाच्या सांस्कृतिक वारसा असलेल्या यज्ञ- यागादींबद्दलचा लेख मात्र अंधश्रद्धा ठरतो.
लेखातील उदाहरणे मलाही पटली नाहीतच. ती खरी मानायची की नाही हा ज्याचा त्याचा मुद्दा ठरतो.
आणि ह्या भारतातील यज्ञ- यागांबद्दल जेव्हा पाश्चात्य येऊन संशोधन वगैरे करायला लागतात तेव्हा मात्र ' मग, आमचा भारत आहेच श्रेष्ठ' असे काही तरी म्हटले जाते, हे पटत नाही.

कमलाकरजी, ह्या प्रकारचे लेख लिहीत रहा, फक्त उदाहरणे देताना, ती खरोखर पटण्याजोगी आहेत की नाही ह्याबद्दल जर काही लोकांशी चर्चा वगैरे करून मग ती उदाहरणे देता आली तर पहा.