विजय देशमुख यांनी सुचवलेल्या वरवर गूढ वाटणाऱ्या उपायात प्रयत्नवादाचा खालील संदेश दडलेला आहे.
एखादी गोष्ट जमत नाही असे आढळून आले तर जमेपर्यंत ती करीत राहणे. एकदा ती जमली की जमणार नाही असं वाटणारी गोष्टही आपल्याला प्रयत्नांती जमू शकते अशी सकारात्मक भावना आपल्यात निर्माण होईल. असे वारंवार अनुभव घेतले की आपल्याला जमणार नाही अशी गोष्टच या जगात नाही ही असा आत्मविश्वास हे आपल्या स्वभावाचे एक अंग बनून जाईल. (तुळशीच्या रोपाऐवजी इतर कुठलेही काम अंगावर घेऊन हे साध्य करत येईल).