यशवंतराव,
प्रमथपती बाबतचे आपले विवेचन पटले.
मात्र अथर्वशीर्षाचा विचार करता इथे ब्राह्मणांचा प्रमुख असा अर्थ घेता येणार नाही, कारण आधीच्या दोन वर्णनात 'नमो व्रातपतये' म्हणजे व्रात्य, खोडकर असा आणि अशा गणांचा अधिपती असा गणपती असे अर्थ असल्याने एकदम मुद्दा बदलून 'प्रमथ' ह्याचा विचार मंथन करणाऱ्या ब्राह्मणांचा अधिपती असा अर्थ अथर्वशीर्षातील उल्लेखाबाबत तरी सुसंगत वाटत नाही. त्यामुळे इथे (दुष्टांना/ साठी)खोडकर, तापदायक असाच अर्थ घेणे योग्य आहे.