शिव खेरा यांच्या लिविग विथ ऑनर मधला एक विनोद.
एक भरतीय मंत्री परदेशवारीत तिथल्या मंत्र्याच्या घरी जातो. त्याने केलेले श्रीमंती थाटाचे स्वागत पाहून तो थक्क होतो. जेव्हा तो त्यामागचं रहस्य विचारतो तेव्हा परदेशी मंत्री त्याला खिडकीत नेतो आणि तिथून दिसणारा एक पुल दाखवतो आणि म्हणतो १०%. काही दिवसांनी तो परदेशी मंत्री भारत भेटीवर येतो, तेंव्हा त्याचं अजून थाटात स्वागत होतं. तो पण आपल्या मंत्र्याला त्याचं रहस्य विचारतो. मंत्री त्याला खिडकीत नेतो आणि पुल दिसतो का ते विचारतो. परदेशी मंत्री नाही म्हणतो. आपला मंत्री म्हणतो १००%.