जे शब्द मराठी भाषेत एकरूप होऊन गेले आहेत ते मराठीच झाले. उदा. टेबल, रेडियो, फ्रीज, हे इंग्रजी शब्द असले तरी कुठेही खटकत नाहीत. पण बाटली न म्हणता 'बॉटल' कशासाठी? 'कदाचित ' हा शब्द सहज वापरता येत असताना 'मे बी ' कशासाठी? आता 'जखम' हा शब्द मराठीच आहे. उर्दूत 'जख्म' म्हणतात. शिवाय उर्दू शब्दात अक्षराखाली जे टिंब देतात त्याला 'नुक्ता' म्हणतात. त्यामुळे शेवटच्या अक्षराचा उच्चार पूर्ण होत नाही. जसे तुमच्या म्हणण्याप्रमाणे 'खर्च' हा शब्द उर्दू आहे. तर यात शेवटच्या 'च' चा उच्चार पूर्ण 'च' असा होत नाही. तर 'च' चा पाय मोडला जातो. आणि हा 'च' 'चेला' मधल्या 'च' सारखा बोलला जातो. 'चमचा' मधल्या 'च' सारखा नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे की इतर भाषेतले शब्द आपल्या भाषेत आणून भाषा समृद्ध करावी.