लहानपणी माझी मामे बहीण तिच्या लहान बहिणीला म्हणाली...

" हा साधा कॉमन सेन्स आहे"

तेव्हा आमच्या सगळ्यात मोठ्या मावसभावाने सांगीतले की कॉमन सेन्स साधाच असतो. अस्मादिकांचे वय तेव्हा सात वगैरे असावे.

अजूनही 'साधा' म्हणजेच 'कॉमन' ( या शब्दप्रयोगापुरतेच ) हे माहीत असले तरी त्यातले काहीच प्रत्यक्षात जमत नाही ही अवांतर माहिती!